Nagar Rising Marathon | नगर : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील सर्वात मोठी मानाची हाफ मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग मॅरेथॉन (Nagar Rising Marathon) स्पर्धा यंदा रविवारी (ता. १) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन नगर रायझिंग फाउंडेशनने केले आहे. या स्पर्धेसाठी सुमारे दोन हजार धावकांनी सहभाग नोंदविला आहे. यंदाचे हे दहावे वर्ष आहे, अशी माहिती नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) व ‘सोहम ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा यांनी दिली.
हेही वाचा – देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच का सादर केला जातो? जाणून घ्या…

असे आहे नियोजन (Nagar Rising Marathon)
ही मॅरेथॉन स्पर्धा २१ किलोमीटर, १० किलोमीटर व ४ किलोमीटर अशा तीन प्रकारांत होईल. स्पर्धेची सुरुवात अहमदनगर क्लब जवळील हत्तीच्या पुतळ्यापासून होईल. २१ किलोमीटरची मॅरेथॉन रविवारी (ता. १) सकाळी ६ वाजता, १० किलोमीटरची सकाळी ६.३० वाजता तर ४ किलोमीटरची मॅरेथॉन ७.३० वाजता सुरू होईल. मॅरेथॉन निमित्त रविवारी (ता. १) पहाटे ५ वाजेपासूनच विविध कार्यक्रमांचे अहमदनगर क्लबमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी किट मिळणार (Nagar Rising Marathon)
या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांची किट शनिवारी (ता. ३१) दुपारी १ ते सायंकाळी ८ या वेळेत अहमदनगर क्लब येथे देण्यात आली. या किटमध्ये टी शर्ट, चेस नंबर व भेट वस्तूंचा समावेश आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक सहभागी होणार आहेत.

अवश्य वाचा – स्थानिक गुन्हे शाखेची अवैध वाळू वाहतुकीबाबत मोठीकारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या स्पर्धेसाठी आय लव्ह नगर, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व मॅक्सिमस स्पोर्टस अॅकॅडमी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. तर बीगॉस इलेक्ट्रिक, सुहाना मसाले, ओप्पो मोबाईल, सी.टी. पंडोल अॅण्ड सन्स, हेमराज केटर्स, हायड्रेशन पार्टनर क्लिअर, मेडिकल पार्टनर अहमदनगर रिहॅब सेंटर, रिकवरी पार्टनर बाईक टेक पॉईंट, मोबिलीटी पार्टनर ओप्पो हे सह प्रायोजक आहेत.

Table of Contents




