A bicycle for a girl : गरजू मुलींसाठी पोलिसांचा ‘एक सायकल लेकीसाठी’ उपक्रम

संगमनेर : येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गणेशोत्सवाच्या काळात शांतता कमिटीच्या बैठकीत गणेश मंडळे व सामाजिक संस्थाना 'एक सायकल गरजू लेकीसाठी देऊन सामाजिक दातृत्वाचे आवाहन केले होते.

0
गरजू मुलींसाठी पोलिसांचा 'एक सायकल लेकीसाठी' उपक्रम

संगमनेर : येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे (Police Inspector Bhagwan Mathure) यांनी गणेशोत्सवाच्या काळात शांतता कमिटीच्या बैठकीत गणेश मंडळे व सामाजिक संस्थाना ‘एक सायकल गरजू लेकीसाठी’ (A bicycle for a girl) देऊन सामाजिक दातृत्वाचे आवाहन केले होते. याच उपक्रमाला प्रतिसाद देत २५ गरजू विद्यार्थिनींना (Needy students) सायकलींचे वाटप (Distribution of bicycles) करण्यात आले आहे.  

नक्की वाचा : पोलिसांच्या आतही असतो माणुसकीचा झरा’ : शिवाजी डोईफोडे

लायन्स सफायर संगमनेर यांच्या सहकार्याने, प्राणी मित्र संघटना भूषण नरवडे यांच्या मदतीने मालपाणी लॉन्स येथे पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर ,उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. 

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की, पोलिस निरीक्षक मथुरे यांनी अनोख्या उपक्रमातून पोलिसांमधील सामाजिक दातृत्व व वर्दीतील माणसाचे दर्शन घडविले आहे. मुलींचे शिक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकार वेगवेगळे उपक्रम राबवीत असतात. या सामाजिक उपक्रमातून एक चांगला संदेश समाजात जाईल. यात सहभागी झालेल्या संगमनेरकरांचे कौतुक करताना, आपल्या काही अडीअडचणी असतील तर आम्हाला सांगा. आमच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आपल्या मदतीसाठी सदैव उपलब्ध आहेत. तसेच यापूढे १०० सायकल वाटप कार्यक्रम राबवून गरजू मुलींना मदत करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली.  

अवश्य वाचा : रोहित पवार हा बिनडोक माणूस – गोपीचंद पडळकर

या उपक्रमांतर्गत सायकल भेट मिळालेल्या सावित्रीच्या लेकींनी या अनोख्या भेटीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पद्मश्री रेघाटे हिने मिळालेली सायकल हे आमच्या आयुष्याला कल देणारे गिफ्ट असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी मथुरे यांनी स्वःत पुढाकार घेऊन सुरुवात केल्यानंतर शहरातील सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी यात सक्रीय सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी, निवांत जाधव, विठ्ठल पवार आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला सुनीता मालपाणी, भूषण नरवडे, बाळासाहेब देशमाने, अतुल अभंग, सुदीप हासे, कल्याण कासट, श्रीनिवास भंडारी आदी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here