Vegetable Price:सामान्यांच्या खिशाला कात्री;भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ

तापमानवाढीचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत भाजीपाला बाजारात पोहोचू शकत नसल्याने भाजीपाल्यांची आवक ही कमी होत आहे.

0
Vegetable Price:सामान्यांच्या खिशाला कात्री;भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ
Vegetable Price:सामान्यांच्या खिशाला कात्री;भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ

Vegetables : नगर : सध्या भाजीपाल्यांच्या दरात (Vegetable Price) मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी (Farmers) ही दिलासादायक बातमी आहे. कारण त्यांना आर्थिक फायदा होत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीचा फटका बसत आहे.सध्या काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिलत आहे. याचा परिणाम भाजीपाल्यांच्या पिकावर होताना दिसत आहे. त्यामुळं भाज्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

भाज्यांच्या दरवाढीचे कारण काय ? (Vegetable Price)

मागील एक-दोन आठवड्यात अनेक ठिकाणी भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. तापमानवाढीचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत भाजीपाला बाजारात पोहोचू शकत नसल्याने भाजीपाल्यांची आवक ही कमी होत आहे. एवढेच नाही तर तीव्र उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे बाजारात ठेवलेला भाजीपाला लवकर खराब होत आहे. सध्या बटाटे, टोमॅटो, कांदा यांसारख्या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे सर्वत्र भाज्यांचा तुटवडा असतो. मात्र, यंदा पावसाळा सुरु झाला तरी भाज्यांची टंचाई पाहायला मिळत आहे. यावेळी काही भागात मान्सूनचा पाऊस ही उशिराने दाखल झाला आहे. त्यामुळे देखील पिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या हंगामातील पावसात १८ टक्के तूट असल्याचं पाहायला मिळत आहे.

उष्मा आणि कमी पाऊस यामुळे पिकांवर परिणाम (Vegetable Price)

मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, उष्मा आणि कमी पाऊस यामुळे भाजीपाला आणि फळांच्या पिकांवर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यास ही समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे भाज्यांचे दर ही कमी होऊ शकतात. सध्या काही भागातत चांगला पाऊस झाला आहे.

सध्या टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ दक्षिणेकडील राज्यांमध्ये झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे आणि मान्सूनचे उशिरा आगमन यामुळं भाजीपाल्याचे उत्पादन घटल आहे. कडक उन्हामुळं भाजीपाला खराब होऊ लागला आहे. त्यामुळे भावात वाढ होत आहे. मात्र येत्या आठवडाभरात चांगला पाऊस झाल्यास भाजीपाल्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here