नगर : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी ९२ व्या वर्षी निधन (Dr Manmohan Singh Passes Away) झाले.त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मारक उभारावं,अशी मागणी आता काँग्रेसकडून केली जात होती.काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी २८ डिसेंबर रोजी स्मारकासाठी जागा मागितली होती.आता मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधले जाणार आहे. काल(ता.२७) झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
नक्की वाचा : संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडमध्ये विराट मोर्चाचे आयोजन
काँग्रेसने व्यक्त केली नाराजी (Dr Manmohan Singh)
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार झालेत.यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधण्यासाठी सरकारला जमीनही मिळू शकली नाही.हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा अपमान असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी म्हटले.तर मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होत असलेल्या ठिकाणी स्मारक बांधले जावे,अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारकडे केली होती.यानंतर केंद्र सरकारकडून मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने गृहमंत्रालयाच्या वतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करून घेतले जावेत. त्यानंतर विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागेल. विश्वस्त मंडळ स्थापन करून मनमोहन सिंग यांचे स्मृतीस्थळ उभारले जाईल,असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
अवश्य वाचा : मनमोहन सिंग यांच्या निधनावर अण्णा हजारे यांनी व्यक्त केला शोक