नगर : राज्यातील नागरिकांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. राज्य सरकार गणेशोत्सवात (Ganeshotsav) ५६० कोटींचा आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाखांहुन अधिक शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार असल्याची माहिती आहे. याबाबत राज्य सरकारकडुन जीआर (GR) प्रसिद्ध करण्यात आला आहे. आनंदाचा शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया २१ ऐवजी ८ दिवसात पुर्ण करण्यात येतील.
नक्की वाचा : देशात मुसळधार पावसाच्या सरी बरसणार;’या’राज्यात अधिक पावसाचा अंदाज
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मतांच्या पेरणीसाठी आनंदाचा शिधा वाटप होत असल्याची टीका विरोधक करत आहे. लोकांना नोकऱ्या द्या, अशी प्रतिक्रिया आनंदाचा शिधा वाटपावर संजय राऊत यांनी केली आहे.
आनंदाच्या शिधामध्ये काय मिळणार ? (Anandacha Shidha)
गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी १ किलो रवा, चनाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ याकाळात हा शिधावाटप करण्यात येणार आहे. या शिध्याच्या प्रत्येक संच रूपये शंभरप्रमाणे सवलतीच्या दरात वितरीत केला जाणार आहे. आनंदाचा शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया ८ दिवसांत पुर्ण केली जाणार आहे.
अवश्य वाचा : माजी अग्निविरांना दिलासा;सशस्त्र दलात अग्निविरांसाठी १० टक्के पदे राखीव
आनंदाच्या शिधावर विरोधकांचे टीकास्त्र (Anandacha Shidha)
लोकसभा निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आनंदाचा शिधावाटप दोन महिने बंद राहिले होते. त्यानंतर आता गणेशोत्सव काळात हा आनंदाचा शिधावाटप केला जाणार आहे. परंतु आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, याकाळात शिधावाटप केलं जात असल्यामुळे सरकारवर विरोधकांचं टीकास्त्र पाहायला मिळतंय.