Shivaji Maharaj Statue:राज्य सरकारचा मोठा निर्णय!राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर काढलं

0
Shivaji Maharaj Statue:राज्य सरकारचा मोठा निर्णय!राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर काढलं
Shivaji Maharaj Statue:राज्य सरकारचा मोठा निर्णय!राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर काढलं

Shivaji Maharaj Statue : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील (Rajkot) छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटांचा पुतळा काही दिवसांपूर्वी पडला होता. या पुतळ्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर (Mahayuti) टीकेची प्रचंड झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) पुन्हा उभारण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे.

नक्की वाचा : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर,पहा!नेमकं काय घडलं?

शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी २० कोटी रुपयांची निविदा (Shivaji Maharaj Statue)

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी २० कोटी रुपयांची निविदा (Tender) काढली आहे. यासाठी राज्यातील विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया काढली आहे. राजकोट किल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर शिवभक्तांच्या तीव्र भावना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात उमटल्या होत्या. अखेर राज्य शासनाने राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे.

अवश्य वाचा : किरण रावच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटाची ऑस्करसाठी निवड

४ ऑक्टोबरला होणार सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड (Shivaji Maharaj Statue)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासाठी सुमारे २० कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे. काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. इच्छूक शिल्पकारांना ३ ऑक्टोबरपर्यंत शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याचे ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल सादर करावे लागेल. त्यानंतर ४ ऑक्टोबरला सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड होईल आणि राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्याच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here