Aaishvary Thackeray:बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

0
Aaishvary Thackeray:बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण
Aaishvary Thackeray:बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

Aaishvary Thackeray : राजकारण म्हणलं की, बाळासाहेब ठाकरेंचे नाव हे प्रामुख्याने समोर येत. मात्र आता दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा नातू लवकरच राजकारण सोडून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जयदेव ठाकरे व स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) बॉलीवूड पदार्पणासाठी (Bollywood debut) तयार आहे. तो अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) चित्रपटातून सिनेविश्वात पहिलं पाऊल ठेवणार आहे.

ऐश्वर्यला कौटुंबिक पार्श्वभूमी जरी राजकारणाची असली तरी त्याला मात्र राजकारणात जायचं नाही. त्याला सिनेविश्वात काम करायचं आहे. ऐश्वर्य व अनुराग कश्यप यांच्या आगामी प्रकल्पाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. माहितीनुसार,“प्रत्येक मीटिंगमध्ये अनुराग व ऐश्वर्य यांचा चित्रपट हा चर्चेचा मुख्य विषय असतो. हा चित्रपट इंडस्ट्रीतील प्रोडक्शन हाऊसमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला प्रोजेक्ट आहे.”

नक्की वाचा : “मी काही साधू संत नाही”;बीडमधून अजित पवार यांचा इशारा   

ऐश्वर्यला डान्सची आहे आवड (Aaishvary Thackeray)

ऐश्वर्यने २०१५ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. या चित्रपटात काम करताना तो दिग्दर्शनातील बारकावे व त्याचबरोबर अभिनयही शिकला.अभिनयात पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेला ऐश्वर्य उत्तम डान्सर आहे. पहिलाच प्रोजेक्ट त्याला अनुराग कश्यपबरोबर मिळाला आहे, त्यामुळे त्याच्या या चित्रपटाची बरीच चर्चा आहे.

अवश्य वाचा : महाकुंभ परिसरात वाहनांवर बंदी,व्हीव्हीआयपी पास रद्द; उत्तर प्रदेश सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी

ऐश्वर्य उद्धव ठाकरेंचा पुतण्या (Aaishvary Thackeray)

ऐश्वर्य ठाकरे हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतण्या आहे. तसेच तो आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांचा चुलत भाऊ आहे. ऐश्वर्य सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याचे फोटो व डान्स व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचे अनेक फोटो आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here