Aamir Khan : अहिल्यानगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवून पाकिस्तानला धडा शिकविला. यावेळी सैन्याला भारतभरातून पाठिंबा भेटला. यात बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनीही पाठिंबा दिला. पण, तिन्ही खान मंडळींनी भारतीय सैन्याला (Indian Army) पाठिंबा न देता चुप्पी साधली. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे. अशातच आमिर खान (Aamir Khan) याच्या प्रोडक्शनमध्ये निर्माण होणारा नवीन सिनेमा ‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु, या सिनेमाला बॉयकॉट ट्रेंडची भीती सतावत असल्याची चर्चा आहे.
नक्की वाचा : बीडमध्ये पुन्हा राडा!अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण
कोणतीही पोस्ट न करता गप्प राहणे पसंत केले
भारत पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले आहे. या युद्धावेळी सर्व भारतीय लोक सैन्याची स्तुती करतानाच त्यांच्या पाठीशी उभे होते. यामध्ये सर्व स्तरातील मराठी व दाक्षिणात्य कलाकारांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांनीच भारतीय सैन्याला सोशल मिडीयावरून पाठिंबा दिला. यावेळी मोठे प्रस्थ असलेल्या तिन्ही खान यांनी मात्र कोणतीही पोस्ट न करता गप्प राहणे पसंत केले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात असल्याचे बोलले जात आहे.
अवश्य वाचा : भारत ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोहोचवणार;सुप्रिया सुळे,शशी थरूर,श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
डीपी चेंज करत आपली देशभक्ती दाखण्याचा प्रयत्न (Aamir Khan)
ऑपरेशन सिंदूरनंतर आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवण्याचा ट्रेंड अनेकांनी फॉलो केला. यात बॉलिवूड सेलिब्रिटी मागे पडल्याचं दिसून आलं. आमिरनं मात्र आता डीपी चेंज करत आपली देशभक्ती दाखण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या सिनेमाला बॉयकॉट ट्रेंडचा फटका बसू नये यासाठी आमिरनं त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा डीपी चेंज करत आपण देशासोबत असल्याचं दाखवून दिलं असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्याच्या सिनेमाला विरोध करणाऱ्यांनी त्याच्यावर टीका सुरु केली आहे.