नगर : मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत. असाच एक नवीन विषय घेऊन ‘आता वेळ झाली’ (Aata Vel Zaali) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) आणि रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेते प्रतीक गांधी यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. इच्छामरण विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
अनंत महादेवन दिग्दर्शन आणि लिहिलेल्या ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी दिसत आहेत. या सिनेमाची घोषणा प्रतीक गांधी यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे केली आहे.
नक्की वाचा : तेजश्री प्रधानच्या ‘लोकशाही’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट
‘आता वेळ झाली’ या सिनेमात नेमके काय ? (Aata Vel Zaali)
सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या नावातच अवर ग्लास दिसत आहे. त्यातून सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या ओळीचा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे. याचे उत्तर आपल्याला २३ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळणार आहे.
‘हे’ कलाकार मुख्य भूमिकेत (Aata Vel Zaali)
‘आता वेळ झाली’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर अनंत महादेवन यांनी या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया,अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के.अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते आहेत.
अवश्य वाचा : कर रचनेत कोणताही बदल नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
चित्रपटाबद्दल अनंत नारायण महादेवन म्हणतात,” जीवनाचा शेवट आनंदी व्हावा, असे वाटणाऱ्या प्रत्येक वयस्काच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे हृषिकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ची दुसरी बाजू आहे. इच्छामरण हा एक असा विषय आहे, ज्याने या महामारीच्या काळात मला प्रभावित केले. जेव्हा जगाने जीवन आणि मृत्यूकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्यास सुरूवात केली. तरुणाईचाही जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला. भौतिकवादी दृष्टीकोनापेक्षा व्यावहारिक दृष्टीकोनाकडे त्यांचा कल वाढला. हा चित्रपट पाहून वृद्धांच्या मनातील घालमेल तरूणाईला नक्कीच कळेल.’’