Abdul Sattar : नगर : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. विकासकामांवर व योजनांवर होणारी चर्चा आता विरोधकांवरील टीका टिपण्णीवरही येत आहे. अंजिठा येथे झालेल्या सभेत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.
नक्की वाचा : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून अवकाळीची शक्यता!
अब्दुल सत्तार म्हणाले की,
मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो, तर हे किरकोळ लोक माझे काय करणार, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले. अब्दुल सत्तार हे जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. आता नुकतंच अब्दुल सत्तार यांनी अजिंठा या ठिकाणी जाहीर सभा घेतली. या सभेत अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे आणि विरोधकांवर टीका केली आहे.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद” (Abdul Sattar)
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. हे किरकोळ लोक माझ्याशी काय सामना करणार आहेत. मी गेल्या 25 वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची काम केली आहेत. जो विकास कामे करतोय, त्याला मतदान करा”, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले.