Abhay Agarkar : आधी नियमित पाणी पुरवठा करा, नंतर दरवाढ करावी : अभय आगरकर

Abhay Agarkar : आधी नियमित पाणी पुरवठा करा, नंतर दरवाढ करावी : अभय आगरकर

0
Abhay Agarkar : आधी नियमित पाणी पुरवठा करा, नंतर दरवाढ करावी : अभय आगरकर
Abhay Agarkar : आधी नियमित पाणी पुरवठा करा, नंतर दरवाढ करावी : अभय आगरकर

Abhay Agarkar : नगर : पाणी पट्टीत दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेचे (AMC) आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी तयार केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात येणार आहे.‌ मात्र, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर (Abhay Agarkar) यांनी महापालिकेच्या पाणी वितरण नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाणी पट्टी वाढीस विरोध केला आहे. सदर दरवाढ अन्यायकारक असून प्रशासनाने आधी नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावा, नंतर टप्प्याटप्प्याने दरवाढ करावी, अशी मागणी ॲड.‌ आगरकर यांनी केली आहे.

‘संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशोब होणार’-बजरंग सोनवणे

ॲड. अभय आगरकर यांनी म्हटले आहे की,

लोकनियुक्त सभागृह नसताना या निर्णयाला राजकीय पक्षांकडून विरोध होत आहे. मनपा आयुक्तांनी पाणी पट्टी १ हजार ५०० रूपयांवरून थेट तीन हजार रूपये करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ही दरवाढ सामान्य जनतेसाठी अन्यायकारक आहे. मुळात नगर शहरात अनेक भागात दिवसाआड तर काही भागात आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतो. एक तासभर पाणी सोडले जाते. तेवढ्या वेळेत नागरिकांना आठवडाभर पुरेल इतके पाणी मिळत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही (Abhay Agarkar)

तसेच सरकारच्या योजनेतून फेज टू पाणी योजना राबविण्यात आली. तिचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. या योजनेतून नळ जोडणीसाठी नागरिकांकडून मोठी रक्कम घेण्यात आली. प्रत्यक्षात पैसे देऊन फेज टूची जोडणी घेतली तरी नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. अमृत योजना राबवून थेट मुळा धरणापासून पाणी योजनेचे सक्षमीकरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. परंतू ही योजना पूर्णतः अपयशी ठरली आहे, ही वस्तुस्थिती आहे.

कोट्यवधीच्या खर्चानंतरही नियमित पाणी पुरवठा नाही (Abhay Agarkar)

कोट्यवधी रुपये खर्च झाला तरी पाणी पुरवठा नियमित झालेला नाही. हे मनपा प्रशासनासाठी पूर्णतः नामुष्कीची गोष्ट आहे. २४ किलो मीटर अंतरावरून पाणी आणताना विज बिल तसेच इतर खर्च वाढतो हे खरच आहे. पण एवढा खर्च होऊनही पुरेशा दाबाने पाणी मिळत नसेल तर नागरिकांनी पाणी पट्टी वाढ का सहन करावी? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.

काळानुरूप पाणी पुरवठा करताना खर्च वाढणे साहजिकच आहे. परंतू या वाढत्या खर्चाप्रमाणे सुविधाही वाढणे आवश्यक आहे. दुर्दैवाने नगर शहरात पाणी पुरवठा नियमित होत नाही. अनेकदा दुरूस्तीचे कारणांमुळे पाणी पुरवठा खंडित होतो. पाणी देण्यातही मनपा प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी पट्टीत दर वाढ करू नये, असे ही त्यांनी म्हटले आहे.