Abhijeet Sawant : नगर : इंडियन आयडॉल (Indian Idol) ते आज गायन विश्वात 20 वर्ष पूर्ण करत असताना गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग करताना दिसतोय. इंडियन आयडॉल पासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिजीत सावंत आता गुजराती गाण्याचा (Gujarati Song) माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.
अवश्य वाचा: शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव
पहिलं वहिल गुजराती गाणं
नवरात्री उत्सव अगदी तोंडावर असताना अभिजीत ने गायलेल पहिलं वहिल गुजराती मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. प्रेमरंग सनेडो अस या गाण्याचं नाव असून आता गुजराती प्रेक्षकांना देखील अभिजीतच्या आवाजाची जादू अनुभवयाला मिळणार आहे.
नक्की वाचा : आमदार रोहित पवारांच्या आमसभेत नागरिकांचा तक्रारींचा भडीमार
या नव्या गाण्याबद्दल बोलताना अभिजीत सांगतो (Abhijeet Sawant)
” एखादं छान गुजराती फेस्टिवल गाणं करण्याची माझी आधी पासून इच्छा होती. प्रेमरंग सनेडो सारखं गरब्याच गाणं करताना एक छान अनुभव मिळाला सोबतीला नव्या भाषेत प्रयोग करण्याची संधी मिळाली. गुजराती गाण्याला थोडा आपला मराठमोळा ठसका देऊन या गाण्याची रचना केली असून दोन वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती एकत्र घेऊन हे गाणं शब्दबध्द करण्यात वेगळीच गंमत होती आणि ती या निमित्ताने अनुभवली”
अभिजीत ने आजवर अनेक सदाबहार गाण्यानी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे आता तो गुजराती प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज झाला आहे.