Abhishek Kalamkar : नगर : मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरात वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. रविवारी (ता. १२) झालेल्या जन आक्रोश मोर्चात तरुणांना चिथावणी देत आपला देश, धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्यातील दोन चार जण आत गेले तरी हरकत नाही, असे वक्तव्य केले आहे. भारतीय संविधानानुसार (Constitution of India) लोकशाही प्रक्रियेने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना हे शोभत नाही. आजच्या काळात तरूणाईच्या हातात बेड्या नाही, तर चांगल्या रोजगाराची गरज आहे. दुर्दैवाने विद्यमान लोकप्रतिनिधींना आपल्या संवैधानिक जबाबदारीचे भान राहीले नाही, हे दुर्दैव आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी केला आहे.
नक्की वाचा: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर
कळमकर यांनी म्हटले की,
गेली अनेक वर्षे स्वतःला कथित विकास पुरुष म्हणून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीनंतर भूमिका बदलली आहे. आता ते शहर विकासावर, रोजगारावर शब्द बोलायला तयार नाहीत. ऊलट ते जाहीर व्यासपीठावर तरूणाईला आत जाण्याची तयारी ठेवा, असे आवाहन करत आहे. हे विरोधाभासी आहे. कोणत्याही सूज्ञ नागरिकाला ही भूमिका पचणारी नाही.
अवश्य वाचा: “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार
लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण केले पाहिजे (Abhishek Kalamkar)
आज नगरमधील हजारो युवक चांगल्या रोजगाराठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरला जात आहेत. याला कारण नगर शहरात रोजगाराच्या संधी नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. राहिलेल्या तरूणाईला कायदा हातात घेऊन तूरूंगात जाण्याचे आवाहन केले जात असेल तर कोणते पालक आपल्या मुलांना घराबाहेर सोडेल? याचा विचार आणि आत्मपरीक्षण लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे. देश, महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण दल, पोलीस दल सक्षम आहे. तरूणाईने आपली ऊर्जा देशाच्या विकासासाठी खर्च केली पाहिजे,या से त्यांनी म्हटले.
नगरकांनी संविधानिक जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. तुम्ही एकीकडे संविधानाची भाषा बोलता आणि दुसरीकडे तरुणाईला कायदा हातात घेण्याच्या सूचना करता, अशी टीका कळमकर यांनी केली आहे.