
Abhishek Kalamkar : नगर : अहिल्यानगर महापालिकेतील (Ahilyanagar Municipal Corporation) दोन मतदारसंघांमध्ये तब्बल ४ हजार ३८१ दुबार नावे आढळली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) NCP Sharadchandra Pawar) गट यांच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांनी महापालिका आयुक्त आणि मुख्य निवडणूक (Election) अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तीव्र निषेध नोंदवला.
नक्की वाचा : बसमध्ये चोऱ्या करणारी रिलस्टार कोमल आहे खोक्याची भाची
प्रशासनाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित
मतदार याद्यांच्या पारदर्शकतेला आणि निष्पक्षतेला धक्का देणारा हा प्रकार असून लोकशाहीवरील विश्वास डळमळीत करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ आणि अहिल्यानगर महापालिका प्रारूप मतदार यादी या दोन्ही ठिकाणी एकाच मतदारांची नावे मोठ्या संख्येने नोंदवली गेल्याचे आढळले आहे. तब्बल ४ हजार ३८१ मतदारांची नावे ‘श्रीगोंदा’ मतदारसंघातील असून, तीच नावे अहिल्यानगर शहराच्या यादीतही दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा आकडा स्वतःच प्रशासनाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
अवश्य वाचा : जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशात नंबर १ कोण ? वाचा सविस्तर…
आम्हाला स्पष्ट खुलासा हवा (Abhishek Kalamkar)
याबाबत प्रशासनाच्या कामकाजावर कठोर शंका व्यक्त करत, अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून तर हे सर्व करत नाहीयेत ना? अशा प्रमाणात एका विशिष्ट मतदारसंघातील नावे दुसऱ्या यादीत कशी आली? हा निव्वळ तांत्रिक दोष आहे की नियोजित प्रयत्न, याचा जनतेला आणि आम्हाला स्पष्ट खुलासा हवा, असा थेट सवाल अभिषेक कळमकर यांनी उपस्थित केला. यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निलेश मालपाणी, रोहन शेलार, अमोल खाडे, परवेज शेख, अल्तमश जरीवाला, राम झीने, राहुल घोरपडे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


