Suicide | संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एक विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना एका दुकानामध्ये नेऊन तिच्यावर मित्रांच्या मदतीने अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीने विरोध केला असता तिचे हात व तोंड बांधून अत्याचार केल्याने तिने विषारी औषध घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी चार जणांवर बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये घारगाव पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ खेमनर, योगेश रामा खेमनर, (दोघे रा. हिरेवाडी, पोस्ट साकुर, ता. संगमनेर), प्रशांत भास्कर खेमनर (रा. भडांगे वस्ती, साकुर, ता. संगमनेर), विकास रामदास गुंड, (रा. गुंड वस्ती, मांडवे बुद्रुक ता. संगमनेर), विजय खेमनर (रा. हिरेवाडी, पोस्ट साकुर, ता. संगमनेर) यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
नक्की वाचा : टाकळी मानूर दरोड्यातील आरोपी गजाआड
दहावीची विद्यार्थिनी (Suicide)
इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला सकाळी ८.३० च्या सुमारास आजोबांनी शाळेत सोडले. त्यानंतर मैत्रिणींसोबत ते शाळेच्या गेटवर गेले. मात्र, शाळेला सुट्टी असल्याने त्या शाळेमध्ये न जाता तेथुन पुन्हा घरी जाण्यासाठी निघाल्या. रस्त्यात तिच्या मैत्रिणी घरी निघुन गेल्या आणि ती एका दुकानात साहित्य घेण्यासाठी थांबली. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ती साहित्य घेवून निघाली. तेव्हा सौरभ खेमनर हा एका दुकाना समोर उभा होता. तेव्हा सौरभने तिला आडवले व हाताला धरुन दुकानामध्ये ओढले. तेव्हा त्यास “हात सोड नाही तर आरडा ओरडा करेल”, असे म्हणत तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिचे तोंड दाबून दुकानामध्ये घेवून गेला. त्यानंतर सौरभने योगेश खेमनरला दुकानाचे दार ओढून बाहेरुन कुलूप लावण्यास सांगितले. त्यानंतर सौरभ खेमनरने तिच्या तोंडाला व हाताला रुमाल बांधून अत्याचार केला. त्यानंतरही सौरभने योगेश खेमनर यास बोलावून घेवून व त्यास स्टिंग घेवून येण्यास सांगितले. योगेश खेमनर हा काही वेळातच स्टिंग घेवून आला. तेव्हा सौरभ खेमनर याने योगेश खेमनर यास बाहेरुन कुलूप लावून त्याच्या चाव्या विकास गुंड याचेकडे देण्यास सांगितले. प्रशांत भडांगे व विजय खेमनर यांना दुकानाचे समोर लक्ष ठेवुन थांबण्यास सांगितल्यातनंतर सौरभने पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर थोड्यावेळाने त्याने तिच्या तोंडाचा रुमाल सोडला व हाताचे बांधलेले सोडले आणि म्हणाला की, ” तू आता कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर तो थोडा वेळ थांबला आणि योगेश खेमनर यास फोन करुन दुकानाचे शटर उघडण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळात योगेशने दुकानाचे दार उघडले, तेव्हा ती बाहेर आली.
हेही पहा : RCB च्या महिला संघाने करून दाखवले! पहिल्यांदाच पटकावलं विजेतेपद
उपचारीपूर्वी मृत घोषित (Suicide)
या प्रकारानंतर पीडित मुलगी घरी आली आणि आईला म्हणाली “मला फार भीती वाटत आहे”. आईने सांगितले काही धाबरु नको, वडिलांना सांगते. त्यानंतर त्यांच्या घरचे बाहेर असताना घरातून सासूचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला म्हणून घरात गेले असता तेव्हा त्या पीडित मुलीने काहीतरी विषारी औषध घेतले होते. तिच्या तोंडातून फेस येत होता. आईने घाबरुन मुलीच्या वडिलांना फोन करुन सांगितले. मुलीचे आजोबा तिला दुचाकीवरुन दवाखान्यात घेवून गेले. तेव्हा डॉक्टरांनी तिला संगमनेर येथील एक खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, संगमनेर येथे डॉक्टरांनी मुलगी मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.