Abuse of Minor Girls : शिक्षकाने चार अल्पवीयन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Abuse of Minor Girls :श्रीरामपुरात लिंगपिसाट शिक्षक सचिन महाजन गोणारकरकडुन इयत्ता दुसरीच्या ०४ मुलींवर अत्याचार ….

0
Abuse of Minor Girls :श्रीरामपुरात लिंगपिसाट शिक्षक सचिन महाजन गोणारकरकडुन इयत्ता दुसरीच्या ०४ मुलींवर अत्याचार ….
Abuse of Minor Girls :श्रीरामपुरात लिंगपिसाट शिक्षक सचिन महाजन गोणारकरकडुन इयत्ता दुसरीच्या ०४ मुलींवर अत्याचार ….

Abuse of Minor Girls : श्रीरामपूर : शहरातील एका प्रतिष्ठित मराठी शाळेतील शिक्षकाने ०८ वर्षीय चार चिमुकलींवर अयोग्य ठिकाणी स्पर्श करून अत्याचार केल्याची (Abuse of Minor Girls) घटना समोर आली आहे. ‘याप्रकरणी संबंधित शिक्षकाला अटक (Arrest) करण्यात आली असून त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असुन पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अवश्य वाचा: बांगलादेशी कामगार आढळल्यास कामावर ठेवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

शहरातील नामांकित मराठी शाळेतील घटना

शहरातील नामांकित मराठी शाळेतील शिक्षक सचिन महाजन गोणारकर (वय ३५, रा. गोणार्क, ता. कंधार, जि. नांदेड, हल्ली मुक्काम -वार्ड नंबर ०७, श्रीरामपूर) या शिक्षकाची एक ऑगस्ट २०२५ रोजी पवित्र पोर्टलद्वारे संबंधित शाळेवर नियुक्ती करण्यात आली होती. या शिक्षकाने तो शिकवत असलेला वर्गातील इयत्ता दुसरीतील ०४ विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराची माहिती संबंधित विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांकडे केली. याचा जाब विचारण्यासाठी पालकांनी शाळा गाठली, संस्थेच्या प्रमुखांनी सदरचे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ नये म्हणून त्यांच्या पालकांना सांगितले. परंतु पालकांनी इतकी निंदनीय घटना असूनही संस्थेचे प्रमुख अडवतात याबद्दल चीड व्यक्त केली.

हे देखील वाचा: अहिल्यानगरच्या कोठला भागात गोळीबार; एक युवक जखमी

पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल (Abuse of Minor Girls)

त्यानंतर पालकांनी शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेऊन सदर प्रकार त्यांच्या कानावर घातला. दरम्यान शहर पोलीस ठाण्यात सचिन महाजन गोणारकर या शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.