
Abuse on Minor Girl : नगर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा जिल्ह्यातील एका गावात दोन महिन्यांपूर्वी एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Abuse on Minor Girl) झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, पीडित मुलगी नातेवाईकांकडे येथील एमआयडीसी (MIDC) परिसरात आली असता ती गर्भवती असल्याचे लक्ष्यात आल्यानंतर हा प्रकार तिने नातेवाईकांना सांगितला. या प्रकरणी तिच्या नातेवाईक महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अवश्य वाचा : महाराष्ट्राची दिव्या ठरली बुद्धिबळाची राणी! वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास
संशयित आरोपीचे नाव
परीक्षित कल्ल प्रजापती (रा. बांदा, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईक महिलेने (वय २३) दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या गावातील शेतामध्ये शौचासाठी गेली असता, संशयित आरोपी परीक्षित कल्लू प्रजापती याने तिच्यावर जबरदस्ती केली. बळजबरीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नक्की वाचा : नागरिकांच्या प्रश्नाबाबत संवेदनशीलतेने उपाययोजना करा : पालकमंत्री विखे पाटील
गुन्हा उत्तर प्रदेश पोलिसांकडे वर्ग (Abuse on Minor Girl)
ही घटना २५ जुलै २०२५ च्या पूर्वी सुमारे दोन महिन्यापूर्वी बांदा (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील एका गावात घडली असल्याचेही सांगितले. दरम्यान, पीडित मुलगी एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना उत्तर प्रदेशात घडली असल्याने सदरचा गुन्हा उत्तर प्रदेश पोलिसांकडे तपासकामी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.