Abuses on minor girls : पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या सातवर्षीय परप्रांतीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Abuses on minor girls) केल्याच्या घटनेत मुख्य आरोपी शिक्षक संजय उत्तम फुंदे (Sanjay Uttam Phunde) (रा. आनंदनगर, पाथर्डी) याला पाथर्डी पोलिसांनी (Police) शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. शुक्रवारी अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर फुंदे याला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर
फुंदे याचे तात्काळ केले निलंबन
याप्रकरणी आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवर खान सर्वरखान पठाण, उमर नियाज पठाण या चार अन्य आरोपींना गुरुवारी अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. दरम्यान नराधम शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी फुंदे याचे तात्काळ निलंबन केले आहे.
अवश्य वाचा : आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला!
घटनेने परिसरात संतापाची लाट (Abuses on minor girls)
पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार, फुंदे याने गेल्या काही आठवड्यांपासून शाळेच्या सुटीच्या वेळी मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आणि विरोध केल्यास मारहाण केली. पीडितेच्या कुटुंबाने गावातील चार आरोपींना याबाबत सांगितले, परंतु त्यांनी तक्रार न करण्यासाठी दबाव टाकला आणि गावात राहू न देण्याची धमकी दिली. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून, नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.