Accident : संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) चंदनापुरी घाटात एसटी बसचा (ST Bus) अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. संगमनेरहून साकूरकडे ही बस येत असल्याची माहिती समोर आली आहे. बस साईडगटारात एका बाजूला पुर्णपणे कलल्याने हा अपघात (Accident) झालाय.
अवश्य वाचा: राजेंद्र फाळकेंच्या राजीनाम्यामागे हे आहे राजकीय कारण, जाणून घ्या!
चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी
बसमध्ये काही शाळेचे विद्यार्थी देखील होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. १० ते १२ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले आहे. इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरहून साकुरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस चंदनापुरी घाटातून जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली.
नक्की वाचा : शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगातून उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी आशिया
सुदैवाने मोठा अनर्थ टळला (Accident)
अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. बसमध्ये शालेय विद्यार्थीही प्रवास करत होते, मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वांबळे तसेच महामार्ग पोलीस पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू करून वाहतूक सुरळीत केली. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.