Accident : नगर-मनमाड रोडवरील खड्ड्यांनी घेतला बळी; कोपरगावातील तरुणाचा जागीच मृत्यू

Accident : नगर-मनमाड रोडवरील खड्ड्यांनी घेतला बळी; कोपरगावातील तरुणाचा जागीच मृत्यू

0
Accident : नगर-मनमाड रोडवरील खड्ड्यांनी घेतला बळी; कोपरगावातील तरुणाचा जागीच मृत्यू
Accident : नगर-मनमाड रोडवरील खड्ड्यांनी घेतला बळी; कोपरगावातील तरुणाचा जागीच मृत्यू

Accident : कोपरगाव : नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad Highway) खड्ड्यांनी पुन्हा एका तरुणाचा बळी घेतला आहे. मंगळवारी (ता.२८) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास, येवला नाका, बजाज शोरूम समोर घडलेल्या या अपघातात (Accident) आदित्य देवकर (रा. इंदिरापथ, कोपरगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाला.

अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे

खड्ड्यामुळे पडला असता त्यावरून वाहन गेले

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नगर-मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर प्रकाशव्यवस्था नसल्याने (स्ट्रीटलाईट बंद असल्याने) वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण झाले आहे. याच कारणामुळे सदर तरुण या मार्गावर आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना खड्ड्याच्या बाजूला पडला असता त्यावरून अज्ञात वाहन गेले असल्याचे समजते. या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त (Accident)

स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वर्षानुवर्षे हा रस्ता अपघातांचा काळा ठिपका बनला असून, दरवर्षी अनेक तरुणांचा या महामार्गावर बळी जात आहे. तरीही संबंधित विभाग आणि प्रशासनाकडून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात येत नसल्याबद्दल नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. स्थानिकांनी या अपघातानंतर तातडीने खड्डे बुजविण्याची आणि रस्त्यावर योग्य प्रकाशव्यवस्था बसविण्याची मागणी केली आहे.