Accident : पाथर्डी : मिरी येथे मंगळवारी(ता.१६) रात्री सात वाजण्याच्या सुमारास गेवराईहून वांबोरीकडे जाणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रकने राजयोग मंगल कार्यालयाजवळ उभे असलेल्या मोटरसायकलस्वाराला धडक दिल्याने या अपघातात (Accident) दोन तरुण जागीच ठार झाले. मिरी ग्रामस्थांनी मिरीमार्गे ट्रक, ट्रॅक्टरने होणारी ऊस वाहतूकच (Transportation of Sugarcane) बंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) करण्याचा इशारा दिला आहे.
अवश्य वाचा: दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ‘पारनेर बंद’
रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोन्ही तरुणांना धडक
ट्रक अपघातात मयत झालेल्या दोन्ही युवकांवर मोठ्या जड अंतकरणाने मिरीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, मिरी येथील गणेश किसन वाघ (वय ३८) व तेजस देविदास जगताप (वय २०) हे दोघेजण मिरी येथील राजयोगमंगल कार्यालयाजवळ मंगळवारी सात वाजण्याच्या सुमारास लाईटच्या कामानिमित्त उभे होते. त्यावेळी गेवराईकडून वांबोरीकडे उसाने भरलेला ट्रक जात असताना या ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या या दोन्ही तरुणांना धडक दिल्याने या अपघातात या दोन्ही तरुणांचा दुर्दैव मृत्यू झाला.
नक्की वाचा : महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
चालक ट्रक सोडून पसार (Accident)
अपघात घडल्यानंतर ट्रक चालक उसाच्या ट्रकसह पळून जात असताना केशव शिंगवे गावाजवळ देखील या ट्रक चालकाने काही किरकोळ अपघात केले व पुढे एका शेतात जाऊन हा ट्रक उभा राहिला. त्यानंतर ट्रक चालक तिथून पसार झाला. अपघाताची माहिती समजतात मिरी ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दोन्ही तरुणांना उपचारासाठी नगरला हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संतप्त मिरी ग्रामस्थांनी मिरीमार्गे ट्रक, ट्रॅक्टर मधून होणारी ऊस वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. आणि या ऊस वाहतुकी विरोधात आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला आहे. दोन्ही तरुण गरीब कुटुंबातील असून एक इलेक्ट्रॉनिकचे काम करत होता तर दुसरा देखील एका दुकानात कामाला होता. हाक-नाहक या दोन्ही तरुणांचा या ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे बळी गेला असून ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मिरी ग्रामस्थांनी केली आहे.



