Accident : औरंगपूर फाट्याजवळ अपघातात; दीर-भावजयीचा दुर्दैवी मृत्यू

Accident : औरंगपूर फाट्याजवळ अपघातात; दीर-भावजयीचा दुर्दैवी मृत्यू

0
Accident : औरंगपूर फाट्याजवळ अपघातात; दीर-भावजयीचा दुर्दैवी मृत्यू
Accident : औरंगपूर फाट्याजवळ अपघातात; दीर-भावजयीचा दुर्दैवी मृत्यू

Accident : अकोले : तालुक्यातील औरंगपूर (Aurangpur) फाट्यानजीक पेट्रोल पंपासमोर ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून मोटारसायकल धडकल्याने मोठा अपघात (Accident) घडला. शनिवारी (ता. २८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दीर-भावजयीचा जागीच मृत्यू (Death) झाला.

नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी

ट्रॅक्टर अचानक मागे घेतल्याने अपघात

राजेंद्र दगडू गोडसे (वय ६३) व इंदुमती गंगाधर गोडसे (वय ६०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दीर भावजयीची नावे आहेत. ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून मोटारसायकल धडकली हाेती. ट्रॅक्टर अचानक मागे घेतल्याने हा अपघात घडल्याची माहीती समाेर आली आहे. यामध्ये जबर जखमी झालेल्या लहित बुद्रुक येथील राजेंद्र दगडू गोडसे व इंदुमती गंगाधर गोडसे यांचा जागीच मृत्यू झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त (Accident)

दिवंगत राजेंद्र गोडसे हे संदीप व ज्ञानेश्वर गोडसे यांचे वडील होत, तर दिवंगत इंदुमती या गंगाधर दगडू गोडसे यांच्या पत्नी व चंद्रकांत गंगाधर गोडसे यांच्या आई होत. दरम्यान, राजेंद्र यांचा मुलगा भारतीय सैन्यदलात आहे. तो गावी पोहोचल्यानंतर रविवारी मुळा नदी तिरावर दोघा मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या दुर्दैवी घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.