Accident : रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू; टाकळीमियाँ शिवारात घडला अपघात

Accident : रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू; टाकळीमियाँ शिवारात घडला अपघात

0
Accident : रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू; टाकळीमियाँ शिवारात घडला अपघात
Accident : रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू; टाकळीमियाँ शिवारात घडला अपघात

Accident : राहुरी : घाई घाईत रेल्वे पटरी (Railway Track) ओलांडत असताना एका ४८ वर्षीय महिलेला रेल्वेची (Railway) जोरदार धडक बसली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅं शिवारात ४ एप्रिल सकाळच्या सुमारास घडली. अनिता लक्ष्मण लाहुंडे, (वय ४८ वर्षे, रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) असे या महिलेचे नाव आहे.

नक्की वाचा : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल

मालवाहतूक गाडीची जोरदार धडक

४ एप्रिलला सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अनिता लाहूंडे ह्या शेत मजूरीसाठी मुसळवाडी येथे जात होत्या. दरम्यान टाकळीमियाँ ते मुसळवाडी रस्त्यावरील बोगद्या जवळ लाहूंडे ह्या रेल्वे पटरी ओलांडत होत्या. त्यावेळी त्यांना दौंडकडून मनमाडकडे जाणाऱ्या मालवाहतूक गाडीची जोरदार धडक बसली. या धडकेत अनिता लाहूंडे यांना जबरदस्त मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू  झाला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरिकांची घटनास्थळी धाव (Accident)

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.  त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लाहूंडे यांच्या पतीचे सुमारे १५ दिवसांपूर्वीच निधन झाल्याची माहिती मिळाली. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.