Accident : राहुरी : येथील गोटूंबे आखाडा येथे रस्ता ओलांडत असताना एका महिलेला चारचाकी वाहन जोराची धडक देऊन पसार झाले. या अपघातात (Accident) महिलेचा मृत्यू (Death) झाला असून संतप्त झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी शनी शिंगणापूर (Shani Shingnapur) रस्त्यावर अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची धावपळ झाली.
हे देखील वाचा : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल
अंत्यविधी शिंगणापूर रस्त्यावर करण्याचा निर्णय
राहुरी ते शनी शिंगणापूर रस्त्यावर गोटूंबे आखाडा येथे गयाबाई गंगाराम तमनर (वय ४२) या रस्ता ओलांडत होत्या. तेव्हा भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने गयाबाई तमनर यांना जोराची धडक दिली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्या मयत झाल्या. २७ मे दुपारी बारा वाजेदरम्यान त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी संतप्त झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटूंबे आखाडा येथे शिंगणापूर रस्त्यावर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अवश्य वाचा : कोलकाताची तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर; हैदराबादला नमवले
संतप्त ग्रामस्थांच्या वतीने प्रचंड आक्रोश (Accident)
या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या वतीने प्रचंड आक्रोश व्यक्त करण्यात आला. याबाबत नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटूंबे आखाडा येथील स्मशानभूमीत करण्यात आला.