Accident : पाथर्डी : शेत कामगारांना घेऊन जाणारी पिकअप जीप पलटी होऊन एक व्यक्ती ठार (Death) झाला, तर दहा ते बार महिला जखमी (Injured) झाल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटाच्या वर असलेल्या चकेवाडी गावानाजिक धोकादायक वळणावर ही घटना घडली. भास्कर निवृत्ती शेळके (वय ४२, रा. माणिकदौंडी) असे अपघातामध्ये (Accident) ठार झालेले व्यक्तीचे नाव आहे.
नक्की वाचा: भारताला मोठा धक्का!विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र
स्थानिक नागरिक धावले मदतीला
दहा ते बारा महिला व पुरुष कामगार हे शेत कामासाठी बुधवारी (ता.७) सकाळी मालवाहतूक पिकअप जीपमधून माणिकदौंडीवरून पाथर्डीकडे जात असताना माणिकदौंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हे वाहन वळणावर पलटी झाले. अपघाताची घटना कळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलवले. यात एक पुरुष व आठ महिला गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना नगर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. त्यातील भास्कर शेळके हे उपचारादरम्यान मृत पावले आहे.
अवश्य वाचा: निळवंडेच्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा : आमदार थोरात
जखमींना नगर येथे तातडीने हलवण्यात आले (Accident)
शमशाद जावेद शेख, मनीषा ज्ञानेश्वर शेळके, प्राची राजू पगारे, हजराबी रसूल सय्यद, नायरा अकबर पठाण, सिंधू रमेश गायकवाड, अनिता एकनाथ शेळके, परविन पठाण, अफसाना शेख (सर्व रा. माणिकदौंडी, ता. पाथर्डी) या सर्व नऊ जखमींवर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना नगर येथे तातडीने हलवण्यात आले आहे. या घटनेत अन्य तीन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांची नावे कळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुहास गायकवाड, विजय काळोखे, सोमा घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.