Accident : पाथर्डी : तालुक्यातील कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) करंजी घाटामध्ये गुरुवारी (ता.१९) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नगरकडून पाथर्डीकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या एसटी बस (ST Bus), इनोव्हा कार, टेम्पो, जीप आणि मोटरसायकल अशा जवळपास पाच वाहनांना धडक दिल्याने या अपघातामध्ये (Accident) एसटी बस मधील दोन प्रवासी गंभीर जखमी (Seriously Injured) झाले.
नक्की वाचा : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या
ट्रकचा चालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार
तसेच मोटर सायकलस्वार, इनोव्हा कार, टेम्पो, जीप मधील प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. पाथर्डीहून कल्याणकडे जाणाऱ्या विठ्ठलवाडी डेपोच्या एसटी बस मधील जखमी प्रवाशांना तत्काळ तिसगाव येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले. अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रक घटनास्थळी सोडून पसार झाला. एकाच वेळी सहा वाहनांचा अपघात झाल्यामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
अवश्य वाचा : निराधार बालकांना आधार कार्ड मिळणार
दोन्ही बाजूने वाहनांची लांबच-लांब रांग (Accident)
अपघात नेमकी कोणत्या वाहनाचा झाला आणि कशामुळे झाला याबाबत काही वेळ मोठी संभ्रम अवस्था निर्माण झाली. एका ट्रकमुळे इतर पाच वाहनांचे अपघात या ठिकाणी झाले असून या अपघातामध्ये सर्व वाहनांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. माणिक शहा पिरबाबा दर्गा जवळील धोकादायक वळणावरच हा अपघात झाल्याने या ठिकाणी घाटातील दोन्ही बाजूने वाहनांची लांबलचक रांग लागली होती. काही वेळाने या ठिकाणी राज्य पोलीस महामार्ग विभागाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली. सातत्याने या धोकादायक वळणाजवळ वाहनांचे अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वळणाची दुरुस्ती करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.