Accident : अहिल्यानगर जिल्ह्यात सहा महिन्यात ९९९ रस्ते अपघात; ४८१ जणांचा बळी

Accident : अहिल्यानगर जिल्ह्यात सहा महिन्यात ९९९ रस्ते अपघात; ४८१ जणांचा बळी

0
Accident : अहिल्यानगर जिल्ह्यात सहा महिन्यात ९९९ रस्ते अपघात; ४८१ जणांचा बळी
Accident : अहिल्यानगर जिल्ह्यात सहा महिन्यात ९९९ रस्ते अपघात; ४८१ जणांचा बळी

Accident : नगर : जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्याच्या कालावधीत अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात ९९९ अपघात (Accident) झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक अपघात राष्ट्रीय (National) आणि राज्य महामार्गावर (State Highway) झालेले आहेत.

नक्की वाचा : पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड

अपघातात काहींनी हातपाय तर काहींनी जीव गमवला

वाहतुकीचे नियम न पाळणे, दारू पिऊन वाहन चालविणे यामुळे अपघात होत आहेत. या अपघातात काहींना हातपाय तर जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाबरोबरच नागरिकांनी वाहन नियमांचे पालन केले पाहिजे. गेल्या सात महिन्यात ४८१ जणांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे आकडेवारीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील हे रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत.

अवश्य वाचा : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा

जिल्ह्यातील महामार्गांची दिवसेंदिवस दुरवस्था (Accident)

दिवसेंदिवस अपघातात वाढ होत असून या जिल्ह्यातील महामार्गांचीही दिवसेंदिवस दुरवस्था होत चालल्याने संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे.  जिल्ह्यातून कल्याण- तीसगाव, पाथर्डी, दौंड, नगर मनमाड, पुणे-नगर-छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, जामखेड, हे राष्ट्रीय महामार्ग जातात. सर्वाधिक अपघात या महामार्गावर होतात. राष्ट्रीय महामार्गावर जिल्ह्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यात तब्बल ९९९ अपघात झाले आहेत. त्यात ४८१ जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर वाहने सुसाट वेगाने धावतात, त्यामुळे अपघात होतात. अपघात रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही अपयशी ठरली आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या वेळोवेळी बैठका होतात. त्यांच्याकडून संबंधित प्रशासनाला सूचनाही केल्या जातात. मात्र, त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही? हाच मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. राज्य आणि इतर रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.


नगर तालुक्यातील पांढरीपूल घाटात अनेक वेळा अपघाताच्या घटना होत आहेत. त्यामध्ये अनेक जण जखमी होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सुपा येथेही मोठ्या प्रमाणात अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

अपघाताची आकडेवारी
गेल्या सहा महिन्यातले राष्ट्रीय महामार्गावर ४३९अपघात झाले. त्यात २०८ पुरुषांचा तर 2० महिलांचा असे एकूण २०८ जणांचा मृत्यू झाला. तर राज्य महामार्गावर २५४ अपघात झाले. त्यात ९७ पुरूष तर ८ महिला अशा १२९ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील इतर रस्त्यावर ३०६ अपघात झाले. त्यात १०४ पुरुष तर ३ महिला असे एकूण ११२ जणांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे.

अपघातात ७१२ जणांनी गमवले हात-पाय
वाहतुकीचे नियम न पाळणे, दारू पिऊन, वाहन चालविणे, यामुळे मोठ्या  प्रमाणात अपघात होत आहेत. या अपघातात अनेकांनी हात-पाय गमावले असून जिल्ह्यात ७१२ अपघात झाले असून त्यामध्ये २३७ पुरूष तर ६७ महिला असे एकूण ३०४ जणांनी राष्ट्रीय महामार्गावर अपघातात आपले हात-पाय गमवले आहेत. तर राज्यमार्गावर १८६ अपघात झाले असून त्यात १५५ पुरुष तर ३१ महिला असे एकूण १८६ जणांनी हात-पाय गमावले. इतर मार्गावर  २२२ अपघात झाले असून त्यात १८४ पुरुष तर ३८ महिलांनी आपले हात-पाय गमावले असून जिल्ह्यात ७१२ जणांना अपंगत्व आले आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम न पाळणे, दारू पिऊन वाहन चालविणे, यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर  कडक कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली असून चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे.

बाबासाहेब बोरसे,

पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा, नगर.