Accident Insurance : नगर : महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) राजीव गांधी अपघात विमा योजनेतून (Rajiv Gandhi Vima Yojana) अपघातातग्रस्त (Accident) पात्र विद्यार्थ्यांच्या (Students) बचत खात्यात शिक्षणाधिकारी, योजना कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडून मदतीची रक्कम जमा करण्यात आली असून पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना नुकसान होईल, अशी कोणतीही कृती साखर कारखान्यांनी करू नये : जिल्हाधिकारी
दीड लाखापर्यंत अर्थसहाय्य
शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास, अवयव निकामी झाल्यास अथवा दुर्दैवाने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास शासनाच्या राजीव गांधी अपघात विमा योजनेतून विद्यार्थी व पालकांना औषधोपचार, शस्त्रक्रिया व मदत म्हणून दीड लाखापर्यंत अर्थसहाय्य केले जाते. नुकत्याच शिक्षणाधिकारी योजना कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली.
अवश्य वाचा : अनधिकृत फ्लेक्सवर मनपाचा कारवाईचा बडगा; १२ जणांवर गुन्हा दाखल
विशेष परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य (Accident Insurance)
नगर तालुक्यातील तुकाई मळा प्राथमिक शाळा (केंद्र-गुंडेगाव) येथील अक्षरा अनिल भापकर या विद्यार्थीनीचा ता. १ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी शाळेत खेळताना अपघात झाला होता. तिच्यावर शस्रक्रिया करण्यात आली होती. या कामी शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी संजयकुमार सरवदे, विस्तार अधिकारी रविंद्र थोरात, गटशिक्षणाधिकारी नगर तालुका बाबुराव जाधव , विस्तार अधिकारी मंदा माने-जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ सहाय्यक पल्लवी तुंगार, विषयतज्ञ सुधिर लांडगे, माया हराळ, संजय शेलार यांनी विशेष परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले.