Accused : नगर : शिर्डी (Shirdi) लक्झरी बस लूट प्रकरणातील ९ वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) जेरबंद केला. मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा. केडगाव, ता. नगर) असे जेरबंद आरोपीचे (Accused) नाव आहे.
हे देखील वाचा : वसंत मोरेंची वाटचाल ‘वंचित’च्या दिशेने; प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट.
लुटले होते ५ लाखांना (Accused)
२८ एप्रिल २०१५ रोजी नगरमधून निघालेली लक्झरी बस शिर्डीतील खंडोबा मंदिर परिसरासमोर गेली. त्यावेळी दोन अनोखळी व्यक्तींनी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून रमेशभाई पटेल व त्यांच्या मित्राला बसमधून उतरविले. त्यांना पोलीस ठाण्यात न्यायचे असल्याचे सांगत कारमध्ये बसविले. रमेशभाई यांच्याकडील पाच लाख रुपये तोतया पोलिसांनी काढून घेतले. त्यांना कोपरगाव परिसरात सोडून तोतया पोलीस निघून गेले. या प्रकरणी रमेशभाई पटेल यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेतला होता.
नक्की वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार
सापळा रचून घेतले ताब्यात (Accused)
या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले होते. यात राजेंद्र मोहन फडतरे, विकास पोपट झरेकर, मनोज दत्तात्रय शिंदे, सचिन प्रकाश राजगुरू (सर्व रा. केडगाव, नगर), पंकज तान्हाजी गडाख (रा. टाकळी काझी, ता. नगर) व नितीन पटेल (रा. कोर्ट गल्ली, नगर) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. जेरबंद आरोपींचा साथीदार मच्छिंद्र कांडेकर फरार होता. तो गोंदिया, नागपूर व झारखंड येथे नाव बदलून राहत आहे. तो गुरुवारी (ता. २८) कात्रड, वांबोरी (ता. राहुरी) येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. मच्छिंद्र कांडेकर हा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत.