Accused : व्यापाऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद

Accused : व्यापाऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद

0
Accused : व्यापाऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद
Accused : व्यापाऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद

Accused : नगर : शहरातील तारकपूर रस्ता, शिंदे मळा व वेदांत नगर येथे रस्तालुट करून व्यापाऱ्यांच्या साडेनऊ तोळे वजनाच्या सोन्याची साखळी, सुमारे साडेतीन लाखांची रोकड लुटणाऱ्या (Robbers) व पसार असलेल्या सराईत गुन्हेगाराला (Accused) जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाला यश आले आहे.

नक्की वाचा : वकील दाम्पत्य हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीत

मारहाण करून सोन्याची साखळी लांबवल्याची घटना

वेदांत नगर येथे २५ जुलै २०२३ रोजी प्रकाश विठ्ठलराव मुंडलिक यांना रस्त्यात अडवून त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाची सोनसाखळी दोन चोरट्यांनी लांबवली होती. तसेच, व्यापारी सुनील लालचंद सिरवानी यांना ३ जानेवारी २०२३ तारकपूर रस्त्यावर मराठा मंदिर सायकल मार्ट येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अडवून दुचाकी वरून खाली पडून डिक्कीतील तीन ते साडेतीन लाखांची रोकड लुटून नेण्यात आली होती. तर, दिलीप ज्ञानदेव पवार यांना २७ डिसेंबर २०२३ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घराजवळ अडवून, मारहाण करून त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची साखळी लांबवल्याची घटना घडली होती.

पोलिसांनी घरातून घेतले ताब्यात (Accused)

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिंदे मळा येथील गुन्ह्यात पाहिजे असलेला व पसार असलेला आरोपी अक्षय बाबुराव धनवे (वय ३२, रा.प्रेमदान हाडको, सावेडी) हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन, पडताळणी केली असता तो वेदांत नगर व तारकपूर परिसरातील जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.