Accused : नगर : अहिल्यानगर शहरातील काटवन खंडोबा परिसरात मावा बनवणाऱ्या कारखान्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून चार आरोपीना (Accused) ताब्यात घेतले (Action) आहे. त्यांच्याकडून दोन लाख ८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali police station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
नक्की वाचा : आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…
संशयित आरोपींची नावे
कैलास बबनराव मोकाटे रा. महात्मा फुले रोड , माळीवाडा, सुभाष गुलाबराव डागवाले (वय ४३, रा. भोपळे गल्ली, माळीवाडा), राम पांडुरंग मोकाटे वय २८, रा. माळीवाडा), राहुल सुधीर पारधे वय ३४, रा. माळीवाडा), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा : “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
पोलीस विशेष पथकाची कारवाई (Accused)
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेल्या पोलीस विशेष पथकाचे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार काटवणं खंडोबा परिसरात एका पत्र्याच्या शेड मध्ये अवैध सुगंधी तंबाखू तसेच मावा बनविण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला. यावेळी मावा बनवणाऱ्या मशिनरी मावा, असा दोन लाख ८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संतोष खाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, संभाजी बोराडे, दीपक जाधव यांच्या पथकाने केली.