Accused : दगडफेक प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी 

Accused

0
Accused : दगडफेक प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी 
Accused : दगडफेक प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी 

Accused : नगर : अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात काल (ता. २९) दुपारी दगडफेक झाली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज (ता. ३०) दुपारी संशयित आरोपीना (Accused) डी. एन. मेहेत्रे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने (Court) तीन ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

अवश्य वाचा: सीना नदी पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात

वाहनांची तोडफोड करून दगडफेक

अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात एका विशिष्ट्य धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी कोठला परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावेळी काही लोकांनी वाहनांची तोडफोड करून दगडफेक केली. त्यानंतर संबंधित घटना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करावा लागला. यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात १०० ते १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पोलिसांनी ३० ते  ३५ संशयितांना ताब्यात घेतले होते. संशियत आरोपींना आज दुपारी तीन वाजता न्यायालयात हजार करण्यात आले. यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घडलेल्या घटनेबाबत न्यायालयाला सांगितले. तसेच यातील आणखी काही आरोपी अटक करण्याचे बाकी आहेत.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांचा कोतवाली पोलीस ठाण्यात ठिय्या

आरोपींना सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी (Accused)

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींकडे आणखी चौकशी करायची असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानंतर सरकारी पक्षातर्फे एम. एन. दुबे, एम. यु. कडलक यांनी कामकाज पाहिले. तर आरोपीतर्फे अ‍ॅड. हाफिस जहागीरदार, रफिक बेग, सलिम भाऊसाहेब, महेश तवले यांनी कामकाज पाहिले. यावेळी संशयित आरोपींकडे कुठला ही मुद्देमाल नाही, त्यांच्या घरच्यांना कुठली पूर्व कल्पना दिली नाही. त्यांना पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश डी. एन. मेहेत्रे यांनी संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी  न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.