Accused Arrested : पाथर्डी : खांडगाव (ता. पाथर्डी) येथे ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या थरारक दरोड्याच्या (Robbery) प्रकरणातील शेवटचा फरार आरोपीला (Accused Arrested) पाथर्डी पोलीसांनी (Police) यशस्वीपणे ताब्यात घेतले आहे. या अटकेनंतर आरोपीकडून आणखी चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, परिसरातील गुन्हेगारीविरोधातील पोलिसांची ही कारवाई जोरदार चर्चेत आली आहे.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा
घटनेची माहिती अशी की,
३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्रिभुवनवाडी ते खांडगावदरम्यानच्या रस्त्यावर एका ट्रॅव्हल्स वाहनाला पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने अडवले. कारमधून उतरलेल्या ५-६ दरोडेखोरांनी जबरदस्तीने ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश केला. प्रवाशांना जीवे मारण्याची धमकी देत गावठी पिस्तूल व चाकूचा वापर करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. या प्रकरणी नाशिक येथील पवन सुखदेव खैरनार (वय ३६) यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.
हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?
पाठलाग करून पोलिसांनी केले जेरबंद (Accused Arrested)
या गुन्ह्यात आतापर्यंत १० आरोपींना अटक झाली होती, तर दोन आरोपी फरार होते. तपासादरम्यान २ फेब्रुवारी २०२६ रोजी फरार आरोपी कासार पिंपळगाव शिवारात दिसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हनुमान टाकळी ते जवखेड रस्त्यावर सापळा रचण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पाठलाग करून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. ताब्यात घेतलेल्या आरोपीने आपले नाव आकाश उर्फ गुल्या अनिल वांढेकर (वय २३, रा. मोहज खुर्द, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे सांगितले. सखोल चौकशीत त्याने खांडगाव दरोड्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याच्याकडून पाथर्डी पोलीस ठाण्यातील आणखी चार जबरी चोरीचे गुन्हे उघड झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, सागर बुधवंत, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव आणि रविंद्र चव्हाण यांच्या पथकाने या यशस्वी ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली.



