
Accused in a Murder Case : पाथर्डी: तालुक्यातील कडगाव शिवारात शेतातील चाळीत झोपलेल्या शेतकऱ्याची कापसाच्या गोण्यांच्या चोरीदरम्यान निर्घृण हत्या करून दोन वर्षांपासून फरार (Accused in a Murder Case) असलेल्या आरोपीला पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police Station) पाठलाग करून अटक (Arrest) केली.
अवश्य वाचा: राहुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गेल्या दोन वर्षांपासून होता फरार
या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र चौथा आरोपी करन अजिनाथ कोरडे (रा. मिरी शिवार, ता. पाथर्डी) हा गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. या आरोपीला पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. १० नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री रामदास कारभारी शिरसाठ (वय ५५, रा. कडगाव शिवार, ता. पाथर्डी) हे आपल्या शेतातील कांद्याच्या चाळीतील पत्र्याच्या शेडमध्ये कापसाच्या गोण्यांची राखण करण्यासाठी झोपलेले होते.
नक्की वाचा : निंबळक परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत करणारा जेरबंद
तोंडावर रग दाबून जिवे ठार मारले (Accused in a Murder Case)
याच दरम्यान भाऊसाहेब अशोक निकम, अशोक संजय गिते, श्रीकांत रावसाहेब सूर्यवंशी व करन अजिनाथ कोरडे या चौघांनी कट रचून शेडमधील सुमारे १५ हजार रुपये किमतीच्या १४ कापसाच्या गोण्या चोरी केल्या व त्या जवळच असलेल्या उसाच्या शेतात लपवून ठेवल्या. चोरी करत असताना रामदास शिरसाठ यांना जाग आली व त्यांनी आरोपींना ओळखले. यामुळे आरोपींनी शिरसाठ यांच्या तोंडावर रग व कापूस दाबून जिवे ठार मारले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


