Jaydeep Apte:शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण;आरोपी जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

0
Jaydeep Apte:शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण;आरोपी जयदीप आपटेला १०सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Jaydeep Apte:शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण;आरोपी जयदीप आपटेला १०सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Jaydeep Apte : सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला (Jaydeep Apte) १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

नक्की वाचा : कांदा दरवाढीनंतर केंद्रसरकारचा मोठा निर्णय,सरकार ‘या’ दरानं विकणार कांदा 

फरार आरोपी ११ दिवसांनी पोलिसांच्या जाळ्यात (Jaydeep Apte)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील नागरिकांना संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. घटनेनंतर तब्बल ११ दिवसांनी फरार जयदीप आपटेला काल (ता.४) पोलिसांनी पकडलं आहे. यानंतर जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं. अखेर मालवण न्यायालयाने जयदीपला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

अवश्य वाचा : अभिनेता गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्रींच्या भूमिकेत दिसणार   


सिंधुदुर्गात शिल्पकार जयदीप आपटेंना बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला. पोलिसांनी जयदीप आपटेच्या विरुद्ध लूकआऊट नोटीस देखील जारी केली होती. काल बुधवारी जयदीप आपटे कल्याणमध्ये पोलिसांच्या तावडीत सापडला. आज जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर जयदीप आपटेला मालवणमध्ये आणून मालवण न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

जयदीप आपटेसह चेतन पाटीललाही १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Jaydeep Apte)

आज या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश महेश देवकते यांच्यासमोर पार पडली. यावेळी सरकारी वकील तुषार भनगे यांनी बाजू मांडली. तर आरोपीचे वकील गणेश सोहनी यांनीही त्यांची बाजू मांडली. या दोन्ही ही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयदीप आपटे हा पोलीस कोठडीत राहणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील दुसरा आरोपी आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील याची पोलीस कोठडी आज संपली आहे. त्यालाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर चेतन पाटीलला ही १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here