नगर : अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) घरावर काही जणांकडून हल्ला (Attack) करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून तोडफोड केली आहे. हल्ला करणारे उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थी असल्याची माहिती आहे. हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना हैदराबाद न्यायालयाने जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.काल (ता.२२) काही जणांनी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला केला होता. त्यानंतर यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींना हैदराबाद न्यायालयाने आज १० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
नक्की वाचा : राज्यातून गुलाबी थंडी गायब; पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता
हैदराबाद न्यायालयाकडून सहा जणांना जामीन मंजूर (Allu Arjun)
हैदराबादमधील ज्युबली हिल्स परिसरात अभिनेता अल्लू अर्जुनचे घर आहे. काल (ता.२२) काही जणांनी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला केला होता. त्यानंतर यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. आता या हल्ला करणाऱ्या सहा जणांना हैदराबाद न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना आज सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. हैदराबाद पश्चिम विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (ता.२२) सायंकाळी हातात फलक घेत काही लोक अल्लू अर्जुनच्या घरात घुसले. यावेळी घोषणा देत हे लोक सुरक्षा भींतीवर चढत टोमॅटो फेकू लागले. त्यांना थांबवल्यानंतर त्यांनी घराबाहेर ठेवलेल्या फुलांच्या कुंड्या फोडल्या. त्यानंतर सहा लोकांना अटक करण्यात आली होती.
अवश्य वाचा : अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ,ताजमहलला टाकले मागे
कशामुळे घडला प्रकार ? (Allu Arjun)
हैदराबाद येथील एका सिनेमागृहात ‘पुष्पा २’ या सिनेमाचा प्रीमियर ४ डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुन आला होता. त्याला बघण्यासाठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला होता. याच पार्श्वभूमीवर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घराच्या बाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी काही आंदोलक हे अल्लू अर्जुनच्या घरात घुसले आणि त्याच्या घराची तोडफोडही केली.
ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनने एक कोटी रुपये द्यावेत,शिवाय शक्य आहे तेवढी सगळी मदत करावी, अशा दोन मागण्या या सगळ्या सदस्यांनी केल्या.आता या हल्ल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घेतलं आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अल्लू अर्जुन घरात नव्हता. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. मात्र हे सगळे आंदोलक खूप संतापले होते, असं पोलिसांनी म्हटलं आहे