Achary Devvrat : सी.पी राधाकृष्णन (C.P Radhakrishnan) यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा (Maharashtra Governor) अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता आचार्य देवव्रत गुजरात (Gujrat) आणि महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यभार पाहतील.
आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी (Achary Devvrat)
महाराष्ट्राचे आधीचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना एनडीएच्या वतीने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली होती. सी.पी. राधाकृष्णन यांचा या निवडणुकीत विजय झाला. त्यामुळे आता राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती बनले आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचं नाव समोर आलं आहे. गुजरातचे राजपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
नक्की वाचा : गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट;भाच्याने केले ‘हे’ गंभीर आरोप
कोण आहेत आचार्य देवव्रत? (Achary Devvrat)
आचार्य देवव्रत हे एक राजकारणी आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत, ते सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत. यापूर्वी आचार्य देवव्रत हे हिमाचल प्रदेशचे जवळपास चार वर्ष राज्यपाल होते. २०१५ पासून ते २०१९ पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर ते २०१९ मध्ये गुजरातचे राज्यपाल झाले, आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचा देखील पदभार सोपवण्यात आला आहे.
अवश्य वाचा : पीयूसी नसल्यास पेट्रोल–डिझेल मिळणार नाही; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश
सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे आधीचे राज्यपाल होते. मात्र त्यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत सी.पी राधाकृष्णन यांचा विजय झाला, ते उपराष्ट्रपती झाले, सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याबाबत उत्सुकता होती, अखेर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडेच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे.