Action : नगर : अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर पोलीस (Police) व महापालिका प्रशासनाने धडक कारवाई (Action) करत गुरुवारी (ता. १८) रोजी सकाळी चार कत्तलखाने (Slaughterhouse) उद्ध्वस्त केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अवश्य वाचा : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…
गोमांस आढळल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
गेल्या दोन दिवसांपूर्वी कोठला परिसरात गोमांस आढळून आल्याने हिंदुत्ववादी संघटना व आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत दोन तास रस्ता रोको आंदोलन करत महापालिका व पोलीस प्रशासनाला धारेवर धरले होते. अनधिकृत कत्तलखाने शहरात सुरू असल्याचा आरोपी त्यांनी केला होता. याबाबत कोतवाली पोलिसांनी शहरातील अनाधिकृत सुरू असलेली कत्तलखाने पाडण्याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच महापालिका प्रशासनाला दिला होता. या घटनेनंतर महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर येऊन झेंडीगेट परिसरातील कत्तलखाने उध्वस्त करण्यात आली.
नक्की वाचा: ‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करावी; आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया
अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित (Action)
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाचे विभाग प्रमुख सुरेश इथापे, प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विभाग पथक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.