
Action against traffic rule violators : नगर : अहिल्यानगरकरांकडून सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन (Violation of traffic rules) होत आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेने (Ahilyanagar City Traffic Branch) दोन दिवस केलेल्या अचानक नाकाबंदीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या (Action against traffic rule violators) वाहनचालकांविरूध्द कारवाई केली. अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक, चांदणी चौक व प्रेमदान चौक येथे ही कारवाई करण्यात आली.
नक्की वाचा: सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
एकूण २२६ ई-चलान
या विशेष मोहिमेदरम्यान फॅन्सी नंबर प्लेट ७९, वाहन चालवताना परवाना जवळ न बाळगणे ९८, ट्रिपल सीट प्रवास १०, मद्य प्राशन करून वाहन चालविणे १०, सिग्नल तोडणे आदी प्रकारांवर कारवाई करण्यात आली. तसेच अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविणे, बुलेट फटाका सायलेन्सर तीन, काळ्या काचा सहा व इतर विविध नियमभंगाच्या २५ प्रकरणांसह एकूण २२६ ई-चलान करण्यात आले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
दोन लाख ८ हजार रूपयांचा दंड (Action against traffic rule violators)
या कारवाईत एकूण दोन लाख ८ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, उपनिरीक्षक मन्सुर सय्यद, उपनिरीक्षक कैलास बोठे, अंमलदार शिरसाठ, विनायक कांबळे, संजय शेटे, मधुकर ससे, सतिष दळवी, प्रवीण खंडागळे, अजय जपकर, आबासाहेब चव्हाण, संदीप शेंडगे आदींच्या पथकाने केली.


