Mohan Joshi: अभिनेते मोहन जोशी साकारणार मनोज जरांगेंच्या वडिलांची भूमिका! 

"संघर्षयोद्धा" या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत. 

0
Mohan Joshi
Mohan Joshi

नगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी ढवळून काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध “संघर्षयोद्धा” (Sangharshyoddha) मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत. 

नक्की वाचा : RCB च्या महिला संघाने करून दाखवले! पहिल्यांदाच पटकावलं विजेतेपद  

शिवाजी दोलताडे यांनी केले संघर्षयोद्धाचे दिग्दर्शन (Mohan Joshi)

शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली असून ,सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.तर अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

अभिनेते मोहन जोशी चतुरस्त्र व्यक्तिमत्व  (Mohan Joshi)

अभिनेते मोहन जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या आहेत. अगदी खलनायकी भूमिकांपासून चरित्र भूमिका पर्यंतचं वैविध्य त्यांच्या अभिनयात आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका त्यांच्या आजवरच्या भूमिकांमध्ये एक लक्षणीय भूमिका ठरणार आहे. स्वतःच्या मुलाचा संघर्ष, त्याची उपोषणं, राज्यभरातून मराठा समाजाकडून मिळणारा पाठिंबा या काळात एका वडिलांची घालमेल मोहन जोशी यांच्या सशक्त अभिनयातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता फक्त २६ एप्रिल पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अवश्य वाचा : ‘गुगल मॅप’वर अहमदनगरचे झाले अहिल्यानगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here