Saif Ali Khan attack : मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे.बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर हल्ला (Attack) झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात तो जखमी (Injured) झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली.
नक्की वाचा : ‘संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशोब होणार’-बजरंग सोनवणे
सैफ अली खानवर चाकूने हल्ला (Saif Ali Khan Attack)
सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात दरोडेखोर शिरला होता.त्याने सैफ आली खानवर चाकूने हल्ला केला. घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं.सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत त्याच्या मानेला व मणक्याला दुखापत झाली आहे.
मुंबई पोलीस काय म्हणाले ?(Saif Ali Khan Attack)
गुरुवारी मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला,त्याने त्याच्या मोलकरणीबरोबर वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला केला. या घटनेत तो जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
अवश्य वाचा : ‘अहिल्यानगर महाकरंडक’ उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला;शिवकालीन शस्त्र व नाणी ठरणार प्रमुख आकर्षण
लीलावती हॉस्पिटलमधून सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.“सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत,” असं लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ निरज उत्तमानी म्हणाले. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देता येईल,असंही डॉ.उत्तमणी यांनी सांगितलं.