shah rukh khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shaharukh Khan)आजही प्रेक्षकांना भुरळ घालतो. फक्त बॉलीवूडच नव्हे तर परदेशात ही अभिनेता शाहरुख खानचे करोडो चाहते आहे. नुकताच किंग खानचा एक मोठा सन्मान करण्यात आला आहे. पॅरिसमधील (Paris) गेर्विन म्युझियमने बॉलीवूड सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानला सोन्याची नाणी (Golden Coins) देऊन सन्मानित (Honoured) केलं आहे. सोन्याच्या नाण्यावर झळकणारा हा पहिला भारतीय अभिनेता आहे.
नक्की वाचा : २० दिवसांनंतर पंढरीच्या विठूरायाला मिळणार आराम!
युनिव्हर्स क्लबने ट्विटर अकाऊंटवर शेअर केली माहिती (Shah Rukh Khan)
शाहरूख खान युनिव्हर्स क्लबने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दलची माहिती फोटोद्वारे शेअर केली आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक किंग खानच्या सोन्याच्या नाण्यावरचा फोटो पाहायला मिळत आहे. पॅरिसमधील गेर्विन म्युझियम हे ग्रँडस बुलेव्हार्ड्सवर असलेले मेणाचे संग्रहालय आहे. २००८ मध्ये इथे किंग खानचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला होता. त्याचबरोबर युके, जर्मनी, भारत, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील संग्रहालयात शाहरुख खानचे वॅक्स स्टॅच्यू आहेत. इतकेच नव्हे तर, शाहरुख खानचे वेगवेगळ्या देशात एकूण १४ स्टॅच्यू बनवण्यात आले आहेत.
अवश्य वाचा : पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही;कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांचा दहशतवाद्यांना इशारा
२०२३ मध्ये, शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना तीन मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. पठान, डंकी आणि जवान या तीन चित्रपटाने वर्ल्ड वाइड कोट्यवधींची कमाई केली होती. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून शाहरूख खानच्या गोल्ड कॉइन वर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची एक झलक पाहायला शेकडो फॅन्स त्याच्या घराखाली उभे असतात. यात अनेक परदेशी चाहते ही दिसून येतात.