Parna Pethe:अभिनेत्री पर्ण पेठे बनली रुबीना;’जिलबी’चित्रपटात अनोख्या अंदाजात झळकणार 

0
Parna Pethe:अभिनेत्री पर्ण पेठे बनली रुबीना;'जिलबी'चित्रपटात अनोख्या अंदाजात झळकणार 
Parna Pethe:अभिनेत्री पर्ण पेठे बनली रुबीना;'जिलबी'चित्रपटात अनोख्या अंदाजात झळकणार 

parna pethe : मालिका, नाटक चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री पर्ण पेठे (Actress Parn Pethe) आता ‘जिलबी’ चित्रपटात (Jilabi Movie) एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. पर्णने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा ‘जिलबी’ चित्रपटातील रुबीना (Rubina)ही मुस्लिम मुलीची भूमिका खूपच वेगळी आहे. रुबिना अत्यंत कणखर आणि धाडसी मुलगी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.

नक्की वाचा : ‘स्थळ’ चित्रपटाद्वारे सचिन पिळगांवकर यांचे चित्रपट प्रस्तुतीत पदार्पण; पोस्टर प्रदर्शित

‘जिलबी’ चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार (Parna Pethe)

अभिनेता स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या  कलाकारांच्या भूमिका ‘जिलबी’ चित्रपटात आहेत. या भूमिकेसाठी तिचा लूक वैशिष्ट्यपूर्ण आहे.आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पर्ण सांगते, ‘मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्ये, भूमिकेत काही वेगळेपण असेल, तर ते करायला आवडतं’. चांगल्या विषयामुळे मी या चित्रपटाला होकार दिला. माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून ‘जिलबी’ चित्रपटातील माझ्या या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास पर्ण व्यक्त करते. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये सस्पेन्स थ्रीलरपटांची संख्या फार कमी आहे. ‘जिलबी’ हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल,असे पर्ण सांगते.

अवश्य वाचा : चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा हाहाकार;भारताला धोका?

१७ जानेवारीला प्रदर्शित होणार चित्रपट  (Parna Pethe)


‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here