Prajakta Mali:अभिनेत्री प्राजक्ता माळीने धरला ‘मदनमंजिरी’ गाण्यावर ठेका;लावणीवर चाहते फिदा

0
Prajakta Mali:अभिनेत्री प्राजक्ता माळीने धरला 'मदनमंजिरी' गाण्यावर ठेका;लावणीवर चाहते फिदा
Prajakta Mali:अभिनेत्री प्राजक्ता माळीने धरला 'मदनमंजिरी' गाण्यावर ठेका;लावणीवर चाहते फिदा

Prajakta Mali : मागील काही दिवसांपासून सगळीकडे ‘फुलवंती’ (Phullwanti) सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता या सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘मदनमंजिरी’ (Madanmanjiri) असं या गाण्याचे नाव आहे. ‘मदनमंजिरी’ गाण्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने चांगलाच ठेका धरला आहे. बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजन करायला मदनमंजिरी सज्ज झाली आहे.

नक्की वाचा : राज्य सरकारचा मोठा निर्णय!राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर काढलं

‘मदनमंजिरी’ गाण्याला गायिका वैशाली माडेचा स्वरसाज (Prajakta Mali)

अशी मी -मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी, अशी मी मदनमंजिरी, चटक चांदणी चमचमते अंबरी असे या गाण्याचे बोल आहेत. अतिशय ठसकेबाज ही शब्दरचना गीतकार डॉ. प्रसाद बिवरे यांची असून वैशाली माडे यांच्या आवाजाने या गाण्याला चारचाँद लागले आहेत. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे तर नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. या गाण्यातला जोश प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारा आहे. या गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणे गाताना खूप मजा आल्याचं वैशाली सांगते. प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच ठेका धरायला लावेल.अभिनेत्री प्राजक्ताच्या नृत्यानं या गाण्याला अजून रंग चढला आहे.

अवश्य वाचा : पारनेरमध्ये आमदार कोण होणार?

११ ऑक्टोबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला  (Prajakta Mali)

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘फुलवंती’ हा चित्रपट मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित भव्य कलाकृती आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. अविनाश- विश्वजीत यांनी संगीताची धूरा सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी,प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. या  चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here