Shivali Parab:अभिनेत्री शिवाली परबच्या ‘मंगला’ चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित;’या’ दिवशी येणार सिनेमा भेटीला 

0
Shivali Parab:अभिनेत्री शिवाली परबच्या 'मंगला' चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित
Shivali Parab:अभिनेत्री शिवाली परबच्या 'मंगला' चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित

नगर : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) तिच्या अवखळ आणि वेगवेगळ्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवत असते.आता ती ‘मंगला’ (Mangala Movie) या चित्रपटात वेगळी भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर (Teaser Relese) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला.

नक्की वाचा : राज्यात थंडीचा पारा वाढणार;पंजाबराव डख यांचा अंदाज

ऍसिड हल्ला झालेल्या गायिकेचा प्रवास (Shivali Parab)

‘मंगला’ या चित्रपटाच्या टीझरने चित्रपटातील रहस्य ताणून ठेवले आहे. ऍसिड हल्ल्याने वाईट वेळ आलेल्या एका गायिकेचा खराखुऱ्या प्रवासाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये शिवाली परबसह शशांक शेंडे, अलका कुबल, डॉ. संजीव कुमार पाटील, विशाल राठोड या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी ठरत आहे

एखाद्याच्या रूपाबरोबर त्यांच्यातील कलेला पुढे जाऊ न देता वाईट सूड घेऊन काही राक्षसी लोकं या चांगल्या कलेला त्रास देतात,हे या चित्रपटात पाहायला मिळत आहे. मात्र शेवटी विजय हा नेहमीच सत्याचा होतो असं म्हणतात, त्याप्रमाणे खरंच या हल्ल्यातुन त्या गायिकेचा विजय होईल का हे चित्रपट पाहिल्यावरचं कळणार आहे.  नुकताच चित्रपटाचा टीझर आणि संगीत अनावरण सोहळा दणक्यात पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

अवश्य वाचा : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही?आदिती तटकरेंच महत्वाचं विधान  

‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Shivali Parab)

‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. तर चित्रपटातील गाणी निहार शेंबेकर, रोंकिनी गुप्ता, स्नेहल मालगुंडकर या गायकांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केली आहेत. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मंगलाची ही खरीखुरी कथा १७ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here