Shreya Bugde: श्रेया बुगडे दिसणार नव्या अंदाजात;झी मराठीवरील ‘या’ कार्यक्रमाचे करणार सूत्रसंचालन 

श्रेयासोबतच अमृता खानविलकर, संकर्षण कऱ्हाडे देखील या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमात हे तिन्ही कलाकार दिसणार आहेत. या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

0
Shreya Bugde: श्रेया बुगडे दिसणार नव्या अंदाजात;झी मराठीवरील 'या' कार्यक्रमाचे करणार सूत्रसंचालन 
Shreya Bugde: श्रेया बुगडे दिसणार नव्या अंदाजात;झी मराठीवरील 'या' कार्यक्रमाचे करणार सूत्रसंचालन 

Drama Juniors : चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे(Actor shreya Bugde) नेहमीच आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकत असते. झी मराठीवरील (Zee Marathi) चला हवा येऊ ही मालिका बंद झाल्यानंतर मालिकेतील इतर कलाकार वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र, श्रेया बुगडे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही मालिकेत दिसली नव्हती. मात्र आता श्रेया लवकरच’ ड्रामा ज्युनियर्स’ (Drama Juniors) या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नक्की वाचा : पंतप्रधान होताच मोदींचा मोठा निर्णय;पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी

‘ड्रामा ज्युनियर्स’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर (Shreya Bugde)

श्रेयासोबतच अमृता खानविलकर, संकर्षण कऱ्हाडे देखील या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमात हे तिन्ही कलाकार दिसणार आहेत. या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यात अमृता आणि संकर्षणचे अपहरण करण्यात आले आहे. अमृता आणि संकर्षणला एका खोलीत बंद करुन ठेवलेले दिसत आहे. त्यानंतर अनेक लहान मुले येऊन त्यांच्याभोवती आरडाओरडा करताना दिसत आहे. त्यात लहान मुलांनी वेगवेगळ्या चित्रपटातील पात्रांची नक्कल केली आहे. त्यानंतर अमृता घाबरुन पाणी मागते. तेव्हा श्रेया बुगडे पाण्याचा ग्लास घेऊन येते. श्रेयालादेखील तिथे पाहून अमृता आणि संकर्षणला आश्चर्याचा धक्का बसतो. या प्रोमोत लहान मुले त्यांच्या परिक्षकाला शोधताना दिसत आहे. तेव्हा अमृता आणि संकर्षणने परिक्षक व्हावे असं लहान मुले मागणी करतात.

अवश्य वाचा : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी दमदार विजय

झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या कार्यक्रमात लहान मुले त्यांचे परफॉर्मन्स सादर करणार आहेत. या सादरीकरणाचे संकर्षण आणि अमृता परिक्षण करणार आहे. तर श्रेया बुगडे  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here