नगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी ‘आई तुळजाभवानी’ (Aai Tuljabhavani) या मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळालेत.अशातच आता म्हाळसा देवीच्या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडेची (Surabhi Hande) या मालिकेत एन्ट्री होणार आहे. जवळपास १० वर्षांनी सुरभी ही म्हाळसाच्याच भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नक्की वाचा : ‘ईव्हीएम संदर्भात बोलणं म्हणजे विरोधकांचा बिनडोकपणा’- गोपीचंद पडळकर
सुरभी हांडे साकारणार म्हाळसाचे पात्र (Surabhi Hande)
म्हाळसा या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात सुरभी हांडेने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.आता ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेच्या माध्यमातून सुरभी प्रेक्षकांवर छाप पाडायला सज्ज आहे. चेहऱ्यावर भक्तीमय तेज, आकर्षक दागिने, पारंपारिक साडी, प्रभावशाली असं दैवी व्यक्तिमत्त्व म्हाळसाच्या रुपात पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या कथानकाने वेग पकडला असून असुरांपासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी म्हाळसा तुळजा भवानीला पाठिंबा देताना दिसून येईल.
नक्की वाचा :‘आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व हरपलं’;विखेंकडून श्रद्धांजली
सुरभी हांडे नेमकं काय म्हणाली…(Surabhi Hande)
याबाबत बोलताना सुरभी हांडे म्हणाली की, “१० वर्षाने म्हाळसा आता परत सर्वांसमोर येतेय याचा आनंद आहे. म्हाळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसंच ते पात्र साकारायला मला आवडतं. हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास होतं.आता ‘आई तुळजाभवानी’ या पात्राच्या माध्यमातून मला म्हाळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळाली आहे”. ती म्हणाली की, ‘आई तुळजाभवानी’सह म्हाळसा जेव्हा असूरांसोबत युद्ध करते असा सीन शूट करताना मला वाटत होतं की, दोन स्त्रीशक्ती कोणासोबत तरी लढत आहेत. पूजासोबत काम करताना खूप छान वाटलं..तिचंही कौतुक वाटलं. ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत म्हाळसा हे पात्र साकारण्याची संधी दिल्याबद्दल ‘कलर्स मराठी’ आणि बहुरुपी प्रोडक्शनचे आभार”.