District Bank : नगर : पीक कर्जाची (Crop loan) नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांकडून यापुढे व्याज वसूल न करण्याचा जिल्हा सहकारी बँकेने (ADCC Bank) निर्णय घेतला आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) रावसाहेब वर्पे यांनी दिली.
हे देखील वाचा : वसंत मोरेंची वाटचाल ‘वंचित’च्या दिशेने; प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट
फक्त मुद्दल कर्ज वसूल (ADCC Bank)
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू वर्षात रूपये २९९५ कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे. चालू वर्षात आज अखेर ४६७४ कोटीचे पीक वसुलास पात्र आहे. ३८३३ कोटीचे येणेबाकी कर्ज आहे. शासनाने दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून त्यांना अनुज्ञेय प्रोत्साहनपर व्याज अनुदान रक्कम वजा करून परत फेडीची रक्कम वसूल करण्याबाबत २७ मार्च राेजी सहकार आयुक्त यांनी कळवल्यानुसार जिल्हा बँकेचा चालू अथकीत वसुलास पात्र पीक कर्ज वसुलीबाबत फक्त मुद्दल कर्ज वसूल करण्याबाबत निर्णय झालेला आहे. त्यानुसार याबाबत शाखांना सविस्तर सूचना कळवल्या असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.
नक्की वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार
बँक शासनाकडे सतत पाठपुरावा करणार (ADCC Bank)
सद्यस्थितीत गतवर्षीच्या तुलनेत बँकेचा वसूल कमी प्रमाणात होत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदान देणे कामी योजने अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून बँकेला सन २०१९-२०२० ते आजपर्यंत १७६ कोटीचे व्याज परतावा अद्यापही जमा झालेला नाही. तसेच महाराष्ट्र शासनाकडुन डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत परतावा योजने अंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांना देण्यात येणारे व्याज सवलत सन २०२१ पासूनची ४०१५९९ सभासदांचे ९९ कोटी ७५ लाखाचे व्याज शासनाकडून अद्यापही जमा झालेले नाही. बँक ठेवीदाराच्या पैशातूनच सर्व प्रकारचे कर्ज वाटप करीत असल्याने व बँकेस ठेवीदारांना मात्र त्यांच्या ठेवी व ठेवीवरील व्याज नियमित द्यावे लागते. शासनाकडून व्याज परतावा वेळेत न आल्याने बँकेवर व प्राथ.वि.का.सेवा संस्थावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. शासनाने वेळेत व्याज परतावे जमा दिल्यास बँक व वि.का.सेवा संस्थांची आर्थिक नुकसान होणार नाही. याबाबत बँक शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहे, अशी माहीती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.