ADCC Bank : नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (ADCC Bank) कर्मचारी भरतीमधील घोटाळ्याबाबतच्या याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी बँकेचे संचालक मंडळ तसेच वर्कवेल इन्फोटेक कंपनीला प्रतिवादी करण्याची परवानगी देऊन त्यांना नोटीस (Notice) बजावण्याचे आदेश दिले आहेत.
नक्की वाचा : बीडमध्ये पुन्हा राडा!अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण
भरतीत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप
वरील बँकेत लिपिकांच्या ६९० जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली होती. ती भरती प्रक्रिया वर्कवेल इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीमार्फत राबविण्यात आली होती.भरतीमध्ये ऑनलाइन परीक्षा व मुलाखत होऊन अंतिम यादी जाहीर झाली आहे. सदर भरतीत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे.
अवश्य वाचा : भारत ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोहोचवणार;सुप्रिया सुळे,शशी थरूर,श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
उत्तरपत्रिकेची कॉपी मिळण्याची वारंवार विनंती (ADCC Bank)
वेळापूर (ता. कोपरगाव) येथील विशाल गोरे व राजेंद्र वैराळ यांना ऑनलाइन परीक्षेतील उत्तरांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या उत्तरपत्रिकेनुसार कमी गुण मिळाले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बँकेच्या कार्यकारी मंडळाकडे अर्ज करून उत्तरपत्रिकेची कॉपी मिळण्याची वारंवार विनंती केली. मात्र, त्यांना ती दिली नाही. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही अर्ज करून हे निदर्शनास आणून दिले. त्यांनीही काहीही कारवाई केली नाही. म्हणून वरील दोघांनी ॲड. नीलेश भागवत व ॲड. योगेश खालकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली.