ADCC Bank Recruitment : नगर : जिल्हा सहकारी बँकेची भरती (ADCC Bank Recruitment) प्रक्रिया परीक्षेच्या रूपाने आज पासून पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे. बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठीच पुण्यासारख्या (Pune) ठिकाणी ऑनलाइन (Online) सिस्टीमने ही प्रक्रिया पूर्ण होणार असून स्वयंघोषित एजंट पासून परीक्षार्थी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सावध राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी केले आहे.
नक्की वाचा : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार,नितीन गडकरींची घोषणा
७०० जागांसाठी आलेत सुमारे २८ हजार अर्ज
जिल्हा बँकेसाठी गुरुवार पासून पुणे भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ७०० जागांसाठी सुमारे २८ हजार अर्ज आलेले आहेत. आपल्या मुलाला अथवा मुलीला जवळच्या नातेवाईकाला या भरतीच्या माध्यमातून नौकरी मिळावी म्हणून गेल्या काही दिवसापासून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्याकडे कार्यकर्ते पदाधिकारी मित्र परिवार नातेवाईक यांची मोठी वर्दळ वाढल्याने बँकेच्या पदाधिकाऱ्यांची देखील यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ठोस भूमिका घेत भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर भूमिकाच बँकेच्या वतीने मांडली असून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते हितचिंतक पदाधिकारी तरुण वर्ग सर्वांनीच प्रामाणिकपणे मोठे सहकार्य केले. म्हणूनच मोठ्या मताधिक्याने माझा विजय झाला त्याबद्दल सर्वांचे आभारी आहेच परंतु जिल्हा सहकारी बँक आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असून या बँकेचा पारदर्शक कारभार सुरू आहे. त्यामुळे होणारी भरती प्रक्रिया देखील पारदर्शकपणे व्हावी अभ्यासू हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय मिळावा हिच माझी प्रामाणिक इच्छा आहे असेही कर्डीले म्हणाले.
अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
९, १०. ११, १२, १३ व १९ जानेवारीपर्यंत होणार परिक्षा (ADCC Bank Recruitment)
तसेच उमेदवारांना परिक्षा देण्यासाठी पुण्यात जावा लागणार आहे कारण अहिल्यानगर जिल्ह्यात इतक्या उमेदवारांची परिक्षा घेण्याची सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध नाहीत. पाहिजे तेवढे परिक्षा घेण्यासाठी कम्प्युटर उपलब्ध नाहीत. त्यांना इथे परिक्षा घेतल्यास काही अडचणी निर्माण होऊ शकतात जसे की लाईट, इंटरनेट कनेक्टिव्हीटी इत्यादी सुविधा पुरेश्या प्रमाणात न मिळाल्यास अडचणी झाल्या असत्या असे कंपनीचे म्हणणे होते, त्यात तथ्य आहे. त्यामुळे या सर्व अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने पुण्यात परंतु नगरच्या जवळ परिक्षा घेण्याचे नियोजन कंपनी मार्फत केले गेले आहे. पुण्यासारख्या ठिकाणी संबंधित कंपनीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया होणार आहे. ९, १०. ११, १२, १३ व १९ जानेवारीपर्यंत ही परिक्षा पार पाडणार आहे.
ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार व्हावी यासाठी राज्य सरकारने त्यांच्या निकषास पात्र सर्व नियम अटी पुर्ण करणार्या सहा कंपन्यांचा पॅनल तयार करून बँकेस कळविला त्यानुसार बँकेने रितसर शासनाचे मार्गदर्शक सूचनानुसार कोटेशन मागवून त्यातील एका कंपनीला या भरती प्रक्रियेचे कामकाज देण्यात आले. नगर येथे भरती प्रक्रिया पूर्ण करायची म्हटले असते तर शनिवार-रविवार दोनच दिवस शाळांना सुट्टी असतात अशावेळी भरती प्रक्रिया करावी लागली असती त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढील अनेक दिवस सुरू राहिली असती. ज्या शिक्षण संस्था उपलब्ध आहेत त्यातील बऱ्याचशा शिक्षण संस्था बँकेच्या संचालक मंडळाशी सलग्न आहेत. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी त्या शिक्षण संस्थेत भरती प्रक्रिया झाली असती तर गैरसमज वाढले असते. त्यामुळे भरती पुण्यात घेण्याचे ठरले आहे.